गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतीयोगिता ही विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता संस्कार रुजवण्यासाठी काम करते.यातून जे उपक्रम राबविले जातात त्यातून भारताचा सुजाण नागरिक घडवणे हे द्येय आहे.चांगल काम करणारी माणसं एकत्र यायला हवी असे प्रतिपादन गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेचे मुख्य समन्वयक गिरीष कुलकर्णी यांनी केले.ते शंकर विद्यालय येथे आयोजित अंतिम मूल्यमापन शाळा भेट प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख होते.प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशन चे पदाधिकारी विश्वजित पाटील,संजय जाधव,संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख,शेषस्मृती क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष वैकुंठराव वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धामध्ये विजेत्या स्पर्धेकांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचा राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर विद्यालयच्या स्वच्छंदी या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मान्यवरांनी संवाद साधला.विविध उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थ्यांनींनी स्वच्छता नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समन्वयक डॉ तुषार देशमुख यांनी केले.स्वागतपर भाषण प्रभारी मुख्याध्यापिका सुचिता फुटाणे यांनी केले आभार भाष्कर काळे यांनी मानले.





