अमरावती. (प्रतिनिधी.)
श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे कार्यरत असलेल्या शैक्षणिक व संगीत क्षेत्रातील प्रा. अवंतिका सुनील मानकर-चौधरी (सौ. अवंतिका सुकृत चौधरी) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने नुकतेच आचार्य (पी एच डी) पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. अवंतिका सुनील मानकर-चौधरी यांनी गणित या महत्त्वपूर्ण विषयातील
“QUALITATIV ANALYSIS OF COSMOLOGICAL MODELS IN MODIFIED THEORIES OF GRAVITATION”
या विषयावर संशोधन पूर्ण केले असून त्यांच्या या संशोधनाची गणितीय क्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.
त्यांनी हा शोधप्रबंध श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय एम. राजूत सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला असून विद्यापीठास सादर केला. तसेच डॉ. ए. वाय. शेख, डॉ. पी. आर. अग्रवाल, डॉ. डी. डी. खेडकर, प्राचार्य डॉ. जी. के. कोरपे सर, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांचे विशेष सहकार्य लाभले.







