एकाच स्पर्धेत मिळवले पाच सिल्वर व ब्रांझ कप



चांदुर बाजार / प्रति :-
अमरावती जिल्हा संघाच्या सेपक टकरा खेळाडूंनी यावर्षी ची सेपक टकरा जुनिअर व सिनियर स्पर्धा गाजवली.मुलांच्या जुनिअर संघाने यावर्षी थेट अंतीम सामन्यात प्रवेश करून सर्वांना धक्का दिला.पहिल्याच सामन्यात बलाढ्य जळगाव संघाचा पराभव करून पुढे वाशीम,जालना ,लातूर संघांचा पराभव करून अंतिम सामन्यात शेवटच्या सेट पर्यंत नाशिक संघा सोबत लढत दिली.आणि उपविजेते पद मिळवले. तसेच इतर गटात मिक्स एव्हेट मध्ये बलाढ्य नाशिक संघाचा पराभव करत अंतिम फेरीत सोलापूर संघाला लढत दिली व उपविजेते पद मिळवले. त्याचप्रमाणे रेगु एव्ह्हेंट मध्ये हि तृतीय स्थान पटकावले. मुलींच्या संघाने राज्यातील प्रबळ संघांचा पराभव करीत जुनिअर व सिनियर गटात उपविजेते पद मिळवले.त्याचप्रमाणे मिक्स गटात रजत व रेगु गटातही रजत पदक मिळवले.प्रचंड गर्मी,समोर बलाढ्य संघ असूनही अमरावती च्या सर्व स्टार खेळाडूंनी अद्वितीय खेळ सादर करून सर्वांना चकित केले. मुलांमध्ये राष्ट्रीय खेळाडू देवान्ग पाटील, सार्थक विधळे, रुद्र पिटकलवार यांच्या सोबत जबरदस्त खेळाडू हर्षल पारिसे व यश कोचे स्वरित भिलपवार यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. त्याचसोबत सागर चौधरी,सर्वेश उमक,निर्भय धोटे,अनुज पारिसे,पियुष दाभाडे,हर्षद बोन्डसे,पियुष झोलेकर,स्वयम नालट यांनी विशेष सहकार्य केले. मुलींच्या गटात राष्ट्रीय खेळाडू भक्ति चौधरी, अंशिका दीवान,श्रावणी लोणारे,आयुषी दिवाण, जेसिका काळे आकांशा ठोके,अंजली राठोड,अक्षरा तायवाडे,नैन्सी जैस्वाल,आरती मरस्कोल्हे,गौरी जोहारे,संज्योत चिपडे,पूर्वी बिहान यांचा समावेश होता.मुलींचा हा संघ जिल्हा सेपक टकरा असोसिएशन चे अध्यक्ष क्रीडा पितामह डॉ हनुमंत लुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुलांचा संघ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक डॉ तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली सराव करतो. या संघाच्या यशाबद्दल जिल्हा सेपक टकरा असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ सुगंध बंड,डॉ हरीश काळे,आनंद उईके,अतुल पडोळे,तेजस कातखेडे,पुष्कर लेकूरवाळे यांच्यासह सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.








