शंकर विद्यालय येथे आबासाहेब बोन्डे स्मृती संगणक कक्षाचे उदघाटन .




प्रतिनिधी / तळवेल :- आधुनिक तंत्रज्ञान हे शिक्षण क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे.आज कृतिम बुद्धिमत्ता ही अपरिहार्य ठरत आहे.शिक्षण सहज होण्यासाठी संगणक अधिक प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन सिपना इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज चे प्राचार्य डॉ संजय खेरडे यांनी केले शंकर विद्यालय तळवेल येथे आयोजित श्री आबासाहेब बोन्डे स्मृती संगणक कक्ष उदघाटन समारंभात ते उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख होते.प्रमुख अतिथी म्हणून देणगीदार आय टी तज्ञ् राखीताई तरार या होत्या तसेच माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागडे,प्रा.डॉ प्रवीण मळसने,माजी मुख्याध्यापक शालिग्राम बोन्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राखी तरार यांनी आपल्या मामाच्या स्मृतीला उजाळा म्हणून शंकर विद्यालयात संगणक कक्ष उपलब्ध करून दिल्याचे सांगितले व यातून उत्कृष्ट विद्यार्थी तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ देशमुख यांनी देणगीदार यांचे अभिनंदन केले व सर्वांनी याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.त्याचप्रमाणे संस्थेतील विविध उपक्रमाच्या मागची भूमिका विषद केली. यावेळी आबासाहेब बोन्डे यांच्या प्रतिमेचे अनावरण व स्मृती वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेच्या कोषाध्यक्षा जयश्रीताई देशमुख,संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तुषार देशमुख यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश वानखडे यांनी जीवन परिचय श्रीधर भोकसे यांनी दिला तर आभार भाष्कर काळे यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील नागरिक पालक मोठया संख्येने उपस्थित होते.







