.


शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद यात्रा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
चांदूर बाजार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अमरावती जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी दुष्काळ संवाद यात्रेला’ चांदूर बाजार तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीक नुकसान व शेतकऱ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या व्यथा व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रयत्नशील आहे.
या यात्रेचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विजय कोळमकर, राष्ट्रवादी काँग्रेस दर्यापूरचे अध्यक्ष डॉ. अभय गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष निलेश गणवीर यांच्या प्रमुख सहभागाने यात्रा पार पडत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चांदूर बाजार तालुका अध्यक्ष डॉ. तुषार देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक कॉ. पंकज आवारे, अनिसचे संघटक ज्ञानेश्वर डवरे, युवक काँग्रेस अध्यक्ष श्रेयस बर्वे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तेजस हिवसे, सर्कल अध्यक्ष यश चर्जन, अनिकेत पापळकर, अभिषेक आठवले, आदित्य वडूरकर, तेजस महानकर तसेच विद्यार्थी काँग्रेसचे भावेश चव्हाण, आयुष कसर, सुमित राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी थेट संवाद साधणारी ही यात्रा चांदूर बाजार तालुक्यात शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती निर्माण करत असून, शेतकरी हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








