

दि. चांदूर बाजार
चांदूर बाजार तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांदूर बाजार येथे दरवर्षीप्रमाणे बळीराजाप्रती आम्ही सारे शिवप्रेमी व छत्रपती शिवराय स्मारक समिती चांदूरबाजार व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवदीपोत्सव, बळीराजा पूजन अविरत उत्साहात छत्रपती शिवराय स्मारक चांदूरबाजार येथे आयोजित करण्यात आले.यावर्षी हे तेरावे वर्ष होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना व महासम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन व सर्वत्र स्मारक परिसरात दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी एकच आवाहन, पाणी बचतीचे महत्त्व विशेष केले. याप्रसंगी सर्व संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ तुषार देशमुख यांनी बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते
जेष्ठ मार्गदर्शक पंकज आवारे,संतोष कोठाळे, न प चे नगरसेवक सचिन खुळे,मराठा सेवा संघांचे गजानन ठाकरे राजेश लेंडे निलेश कडू मंगेश चौधरी गजानन कडू, अनिस चे ज्ञानेश्वर डवरे,रवी कोंडे सुनील पापळकर शिवदीपोत्सव चे संयोजक डॉ. तुषार देशमुख,अमोल म्हस्के,निलेश म्हस्के पूर्णामाय चे संपादक दिनेश आमझरे,संयोजन समिती चे निखिल काटोलकर अजय इंगळे,विक्रांत बोन्डे,साक्षी धनसांडे,प्रतीक काटोलकर ,श्रेयस बर्वे,प्रणव देशमुख संभाजी ब्रिगेडचे अक्षय पांडे,मृत्युंजय आवारे,संतोष किटूकल,सत्यजित देशमुख, अभिजित देशमुख, तेजस हिवसे, यश चर्जन हर्षल खेरडे गोकुळ खेरडे,राजाभाऊ भारसाकळे,भूषण मेश्राम प्रामुख्याने प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार देशमुख यांनी तर आभार निखिल काटोलकर यांनी मानले.









